Share
आपणास माहीत आहे का?
🌺आधुनिक आश्चर्य🌺
🏵️गोल्डन गेट ब्रिज🏵️
कॅलिफोर्नियामधील सॅनफ्रान्सिस्को येथील सॅनफ्रान्सिस्को आणि युनायटेड स्टेट हायवे जोडणारा 'गोल्डन गेट ब्रिज' हा आधुनिक जगातील आश्चर्य मानला जातो. हा पूल यूनाइटेड स्टेट महामार्ग क्रमांक १०१ आणि कॅलिफोर्निया राज्य महामार्ग क्रमांक १ याां दोहोंचा भाग असून, उत्तरेकडून सॅनफ्रान्सिस्कोतून बाहेर पडणारा तो एकमेव मार्ग आहे. 'गोल्डन गेट ब्रिज' १.७ मैल(२७३७ मीटर) व रुंदी ९० फुट म्हणजे (२७.४३ मीटर) आहे. पाण्याच्या पातळीपासून पुलावरील रस्ता २२० फूट उंचीवर असून, पुलाखालील कमानीमधील सर्वाधिक लांब अंतर ४२०० फुट आहे. गाड्या,पादचारी व सायकली या सर्वांसाठी वेगळा मार्गाची रचना या पुलावर आढळते. या फुलावर सहापदरी रस्ता असून त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग आहे. या पुलावरील वाहतूक २७ मे १९३७ रोजी प्रारंभ झाला . या पुलावरून दररोज सरासरी एक लाख गाड्या धावतात. या पुलावरील वेगमर्यादा ताशी ७० किलोमीटर एवढी नियंत्रित ठेवली आहे. न्यूयार्क शहरातील व्हेरॅझनो नॅरो हा पूल होण्याआधी 'गोल्डन गेट ब्रिज' जगातील सर्वात मोठा सस्पेंशन पूल होता.आता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे . या पुलाची रचना जोसेफ स्ट्रान्स या अभियंत्याने केली असून त्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरी बद्दल १९५५ मध्ये त्याचा पुतळा या पुलावर बसवला गेला या पुलाला दिलेल्या नारंगी रंगामुळे 'गोल्डन गेट ब्रिज'धुक्यातूनही उठून दिसतो. आजही जागतिक स्तरावर सॅनफ्रँन्सिस्को चे प्रतीक म्हणून गोल्डन गेट ब्रिज ओळखला जातो.
No comments:
Post a Comment