🏵️१)जमिनीखालचं गाव🏵️ 🌺सौजन्य - लोकमत पेपर कात्रण🌺 जगाच्या पाठीवर आश्चर्याची कमतरता नाही. वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या गोष्टी चमत्कारिक रूपे घेऊन आपल्यासमोर येतात. आता आपलं पहा. आपल्या वसाहती आहेत जमिनीवर! म्हणजे आपण आपली घरे जमिनीवर बांधतो,पण जमिनीखाली ही वसाहत असते आणि तेथेही माणसे राहतात अस आपण पाहिलं किंवा ऐकलं तर ?पण हे खरे आहे असेही एक गाव आहे बर का! ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या अंडलेड या शहरापासून ८५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कुबरपेडी गावातील ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लोक जमिनीखाली राहतात. ही त्यांची जमिनीखालील घरे'खणलेली निवास' म्हणून ओळखले जातात. या भागातील जमीन ही मुरमाची असून इथे झाडेझुडपांची नामोनिशाणीही नाही.इथे वाळूच्या टेकड्या खोदून त्यात त्यांनीही घरे बनवली आहेत. या जमिनीखालच्या घरामधील तापमान वर्षभर २४अंश सेल्सिअस एवढं राहावं म्हणून एअर व्हेंटिलेशन राँफ्ट्स वापरतात. त्यामुळे हवा खेळती राहते व तापमानही स्थिर राहते. या घरांमध्ये मंद प्रकाश, मातीचा कुबट वास क्षीण असा आवाज अशा किरकोळ अडचणी जाणवतात. पण या अडचणींना बाजूला ठेवलं तर भुपुष्ठावर असणारी आपली घरे व जमिनीखालचे घरे या दोघांमधील जीवनात फारसा काही फरक दिसत नाही ,हो,आणखी एक मोठा उपद्रव म्हणजे धुळीचा येथे असलेल्या रेताड जमिनीमुळे आतील बाजूसही त्रास जाणवतो बर का!तर आता केव्हा जायचं आपण या गावाला भेट द्यायला?

Share